मिरजगाव मुली शाळेची सन २०१९-२० सालची यशोगाथा :
यशोगाथा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
७३ वा स्वातंत्र्यदिन समारोह : १५ ऑगस्ट २०१९ :
आज दिनांक १५/८/२०१९ भारतीय स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी सौ.जयश्री हनुमंत सातव ( ग्रा.प.सदस्य ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या आकर्षक बैठक व्यवस्थाने सर्वांचे मन आकर्षित केले.संगीतमय राष्ट्रगीताने राष्ट्रद्वाजास सलामी देण्यात आली.विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत सुंदर भाषण सादर केले.या प्रसंगी परिवर्तन ग्रुपच्या वतीने शाळेला ३२ इंची LED भेट देण्यात आली.यावेळी प.स.कर्जत उपसभापती श्री.प्रशांत बुद्धिवंत, सरपंच श्री.नितीन खेतमाळस, उपसरपंच श्री.अमृत लिंगडे,वर्षाताई तुपे शा.व्य.अध्यक्ष ,सर्व सदस्य ,मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
ध्वजारोहण करताना सौ.जयश्री हनुमंत सातव, समवेत पंचायत समिती उपसभापती प्रशांतभाऊ बुद्धिवंत, सरपंच नितीन खेतमाळस, केंद्रप्रमुख उत्तमराव भोसले, सौ वर्षाताई तुपे, सौ. घोडेस्वार व इतर मान्यवर
परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली शाळेला एल.इ.डी. टीव्ही भेट देताना ग्रुपचे सदस्य व मान्यवर.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली शाळेचा ब्लॉग सुरु :
आज दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली या शाळेचा ब्लॉग सुरु करून विद्यार्थी व पालकांसाठी पहिली पोस्ट शेअर करत आहोत. प्रथमत: ब्लॉगवर येणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत. ब्लॉग हा शाळा व पालक यांच्यामधील विचारांच्या देवाणघेवाणीचा एक चांगला दुवा असेल अशी आशा करत आहोत. आज शाळा व्यवस्थापन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्याच दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर ब्लॉग सूर होत असल्याने मनस्वी आनद होत आहे. पुन्हा एकदा ब्लॉगवर विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व सर्व शिक्षण प्रेमी नागरिकांचे स्वागत करून प्रथम पोस्ट थांबवतो. धन्यवाद.
यशोगाथा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
७३ वा स्वातंत्र्यदिन समारोह : १५ ऑगस्ट २०१९ :
आज दिनांक १५/८/२०१९ भारतीय स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी सौ.जयश्री हनुमंत सातव ( ग्रा.प.सदस्य ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या आकर्षक बैठक व्यवस्थाने सर्वांचे मन आकर्षित केले.संगीतमय राष्ट्रगीताने राष्ट्रद्वाजास सलामी देण्यात आली.विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत सुंदर भाषण सादर केले.या प्रसंगी परिवर्तन ग्रुपच्या वतीने शाळेला ३२ इंची LED भेट देण्यात आली.यावेळी प.स.कर्जत उपसभापती श्री.प्रशांत बुद्धिवंत, सरपंच श्री.नितीन खेतमाळस, उपसरपंच श्री.अमृत लिंगडे,वर्षाताई तुपे शा.व्य.अध्यक्ष ,सर्व सदस्य ,मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली शाळेला एल.इ.डी. टीव्ही भेट देताना ग्रुपचे सदस्य व मान्यवर.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली शाळेचा ब्लॉग सुरु :
आज दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली या शाळेचा ब्लॉग सुरु करून विद्यार्थी व पालकांसाठी पहिली पोस्ट शेअर करत आहोत. प्रथमत: ब्लॉगवर येणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत. ब्लॉग हा शाळा व पालक यांच्यामधील विचारांच्या देवाणघेवाणीचा एक चांगला दुवा असेल अशी आशा करत आहोत. आज शाळा व्यवस्थापन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्याच दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर ब्लॉग सूर होत असल्याने मनस्वी आनद होत आहे. पुन्हा एकदा ब्लॉगवर विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व सर्व शिक्षण प्रेमी नागरिकांचे स्वागत करून प्रथम पोस्ट थांबवतो. धन्यवाद.

No comments:
Post a Comment