Friday, August 9, 2019

ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी मिरजगाव शाळेचा ब्लॉग सुरु.

आज दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली या शाळेचा ब्लॉग सुरु करून विद्यार्थी व पालकांसाठी पहिली पोस्ट शेअर करत आहोत. प्रथमत: ब्लॉगवर येणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत. ब्लॉग हा शाळा व पालक यांच्यामधील विचारांच्या देवाणघेवाणीचा एक चांगला दुवा असेल अशी आशा करत आहोत. आज शाळा व्यवस्थापन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्याच दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर ब्लॉग सूर होत असल्याने मनस्वी आनद होत आहे. पुन्हा एकदा ब्लॉगवर विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व सर्व शिक्षण प्रेमी नागरिकांचे स्वागत करून प्रथम पोस्ट थांबवतो. धन्यवाद.

3 comments:

  1. राज्याचे तज्ञ मार्गदर्शक ,आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते ,उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक श्री बाबा पवार यांच्या ब्लॉग निर्मिती कार्यास शाळेच्या वतीने माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete