Wednesday, August 14, 2019

७३ वा भारतीय स्वातंत्र्य दिन

    आज दिनांक १५/८/२०१९ भारतीय स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी सौ.जयश्री हनुमंत सातव ( ग्रा.प.सदस्य ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या आकर्षक बैठक व्यवस्थाने सर्वांचे मन आकर्षित केले.संगीतमय राष्ट्रगीताने राष्ट्रद्वाजास सलामी देण्यात आली.विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत सुंदर भाषण सादर केले.या प्रसंगी परिवर्तन ग्रुपच्या वतीने शाळेला ३२ इंची LED भेट देण्यात आली.यावेळी प.स.कर्जत उपसभापती श्री.प्रशांत बुद्धिवंत, सरपंच श्री.नितीन खेतमाळस, उपसरपंच श्री.अमृत लिंगडे,वर्षाताई तुपे  शा.व्य.अध्यक्ष ,सर्व सदस्य ,मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.


 ध्वजारोहण करताना सौ.जयश्री हनुमंत सातव, समवेत पंचायत समिती उपसभापती प्रशांतभाऊ बुद्धिवंत, सरपंच नितीन खेतमाळस, केंद्रप्रमुख उत्तमराव भोसले, सौ वर्षाताई तुपे, सौ. घोडेस्वार व इतर मान्यवर


परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली शाळेला एल.इ.डी. टीव्ही भेट देताना ग्रुपचे सदस्य व मान्यवर.

1 comment: